निवृत्तीवेतनधारकांसाठी मोबाईल ॲपचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा 21 जुलै रोजी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 16, 2026

निवृत्तीवेतनधारकांसाठी मोबाईल ॲपचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा 21 जुलै रोजी

 





अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्यातील सेवानिवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनशी संबंधित विविध सेवा अधिक सुलभ, जलद आणि घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्या वतीने 'Maha-UPLABDHI' हे अद्ययावत मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या नवीन ॲपची सविस्तर माहिती पोहोचवण्यासाठी आणि पेन्शनधारकांना या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्यासाठी अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा माहिती व प्रशिक्षण मेळावा मंगळवार, दिनांक 21 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या ॲपच्या सुविधेमुळे आता पेन्शनधारकांना विविध कामांसाठी कोषागार कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तरी अमरावती कोषागार अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या विशेष सत्राला विहित वेळेत उपस्थित राहून डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages