“सिनेमा सिनेमा खेळताना "- कार्यशाळा 2026 संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 15, 2026

“सिनेमा सिनेमा खेळताना "- कार्यशाळा 2026 संपन्न









नवोदित निर्माते व कलावंतांनी चित्रपट उद्योग हा सजगपणे समजून घेणे व त्यांचे रीतसर प्रशिक्षण घेणे हे अतिशय महत्वाचे आहे – फिल्म मेकर पंकज धंदर 

दि. १५ अमरावती :-

अमरावती स्पंदन परिवार बहु.संस्था संचालित बीइंग आर्टिस्ट अकेडेमी ऑफ फ़िल्म अँड थियेटर आर्ट्स, अमरावती द्वारा आयोजित चित्रपट-मालिका-वेब सिरीज व न्यूज मिडिया मधील व्यवसाय व रोजगार संधींची माहिती तसेच प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच रविवार दि . 12 जूलै 2026 रोजी संपन्न झाली .
मर्यादित निवडक प्रशिक्षणार्थीना प्रवेश असनाऱ्या या महत्व पूर्ण कार्यशाळेला अमरावती ,यवतमाळ ,परतवाडा ,तिवसा , चाँदुर बाजार, शिराळा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर , नागपूर अश्या वेगवेगळया भागांतून आलेले प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेत चित्रपट, वेब सिरीज, टी वी मालिका , सोशल मिडीया कंटेंट तसेच इतर माध्यमांची ओळख, कार्यप्रणाली, वेगवेगळे विभाग, त्यातील विविध व्यवसाय व रोजगार संधीची उपलब्धता, माध्यमांचे रीतसर शिक्षणाचे महत्व व आवश्यकता, आर्थिक सहाय्य , विविध खाजगी तसेच शासकिय विभागांमध्ये नोकरी ची पदे व त्यांची प्रक्रिया या बद्दल मुद्देसूद रीतसर मार्गदर्शन प्रशिक्षणार्थीना देण्यात आले.
त्याचप्रमाणे बीइंग आर्टिस्ट अकेडेमी च्या विद्यार्थ्याँद्वारे निर्माण केलेल्या डिप्लोमा फिल्म्स चे विशेष प्रदर्शन करण्यात आले. त्यात चैतन्य सराफ लिखित -दिग्दर्शित "नाते मैत्रीचे" तसेच प्रशिक्षक पंकज धंदर यांच्या लिखित -दिग्दर्शित "दुसरी बाजू" या शॉर्ट फिल्म्स प्रशिक्षणार्थीना दाखवण्यात आल्या तसेच त्यांचे विषय -आशय , निर्मिती प्रक्रीया यांवर चर्चा करण्यात आली.
चित्रपट तसेच इतर माध्यमाच्या रीतसर शिक्षणानंतर स्वयं रोजगार , व्यवसाय ,शासकीय संस्था, अशासकीय संस्था, सरकारी कार्यालये, खाजगी संस्थामधे करियर च्या संधी, तसेच फेलोशीप्स, स्कॉलरशिप, अर्थ सहाय्य मिळविण्याचे विविध मार्ग आणि चित्रपट उद्द्योजकता जनगृती करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट निर्मितीची प्रक्रीया, निर्माता, कथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, प्रकाश योजना, संकलन, ध्वनी, कला दिग्दर्शन, रंगभूषा, वेशभूषा, जाहिरात व प्रसिद्धी, सेन्सॉर सर्टीफिकेशन, वितरण व्यवस्था,आर्थिक गुंतवणुक व मोबदला या सर्व विभागांची कार्य पद्धती तसेच सिनेमा किंवा चित्रपट म्हणजे काय? कला-व्यवसाय-उद्योग-करियर म्हणून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा? यावर चर्चात्मक मार्ग दर्शन करण्यात आले. ओळख परिचय-चर्चा-मार्गदर्शन-फ़िल्मस्क्रिनिँग तसेच अनुभवांची देवाण घेवाण अश्या स्वरूपातील या कार्यशाळांची गरज तसेच चित्रपट निर्मिती चे रीतसर प्रशिक्षण घेणे खरच किती महत्वाचे आहे आणि विशेषतः नवोदित निर्माते ज्यांना चित्रपट निर्मिती मध्ये यायचे आहे त्यांच्या साठी ही कार्यशाळा अतिशय महत्वाची असल्याची जाणीव झाल्याचे प्रशिक्षणार्थीनी आपल्या प्रतिक्रियांमधुन व्यक्त केले. आधी सर्व नीट शिकून घ्यायचं, समजून घ्यायचं,सरावाने पक्कं व्हायचं, मग पुढे जायचं हे साध सरळ सूत्र त्यांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यशाळेच्या आयोजनाची महत्वपूर्ण जबाबदारी बीइंग आर्टिस्ट अकेडेमिक ऑफ फ़िल्म अँड थिएटर आर्ट्स च्या संचालिका स्नेहा वासनिक व प्रशिक्षक म्हणून फ़िल्म मेकर पंकज धंदर यानी जबाबदारी पार पाडली . तसेच विज्ञप्ति पर्वतकर, प्रविण वानखडे, राज इसळ,श्रुती दंदे व साक्षी जीभकाटे यांचे आयोजन सहाय्य लाभले. कार्यशाळेत मनोजकुमार कटकतलवारे, सृष्टी काळे , चेतन खेडकर, रत्नदिप रुपवणे, आशिष वाघमारे , अभिषेक ढोके,आकाश पांडे, प्रफुल्ल सावलकर, प्रशिक पांडे , योगेश म्हाला ई. प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages