अमरावतीत खळबळजनक घटना! तपोवन टेकडीवर सापडला महिलाचा अर्धवट जळालेला मृतदेह - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 2, 2026

अमरावतीत खळबळजनक घटना! तपोवन टेकडीवर सापडला महिलाचा अर्धवट जळालेला मृतदेह




दि. ३ अमरावती:
अमरावती शहरातील तपोवन टेकडी (मार्डी रोड) परिसरात २ जून २०२६ रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास  जंगलात हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. येथील एका निर्जन ठिकाणी एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्डी रोडवरील तपोवन टेकडी परिसरात स्थानिक नागरिकांना एक मृतदेह आढळून आला. नागरिकांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. घटनेची गांभीर्य ओळखून गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) रुग्णालयात पाठवला आहे. गुन्ह्याचा तपास सुलभ व्हावा यासाठी पोलिसांनी घटनास्थळाची नाकाबंदी केली आहे.
महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळाल्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात किंवा हत्या असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेला मारून तिचे शरीर जाळण्याचा प्रयत्न केला गेला का? असा संशय पोलिसांना आहे. या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेवर अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
मृत महिला नेमकी कुठली आहे आणि तिचे वय किती आहे, याचा शोध गाडगेनगर पोलीस घेत आहेत.
 गेल्या काही दिवसांत गाडगेनगर आणि आसपासच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती पोलीस गोळा करत आहेत.
गाडगेनगर पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या धक्कादायक घटनेमुळे अमरावती शहरात सध्या चिंतेचे वातावरण आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages