डॉ. उज्वल बारंगे शुक्रवारी आकाशवाणीवर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 4, 2026

डॉ. उज्वल बारंगे शुक्रवारी आकाशवाणीवर

■ "गुदगत आजार (ऍनोरेक्टल डिसीजेस), कारणे, उपचार आणि प्रतिबंध" विषयावर संवाद



दि.५ अमरावती :
शहरातील प्रख्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉ. उज्वल बारंगे यांची मुलाखत शुक्रवार दि. ५ जून तसेच १२ जून रोजी सकाळी १० वाजता अमरावती आकाशवाणीच्या 'आरोग्य संवाद' या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे. "गुदगत आजार (ऍनोरेक्टल डिसीजेस), कारणे, उपचार आणि प्रतिबंध" या विषयावर डॉ. उज्वल बारंगे यांच्याशी लोकप्रिय निवेदक नितीन भट यांनी साधलेल्या संवाद दोन भागांत प्रसारित होणार आहे.
गुदगत आजार (Anorectal Diseases), हा आजार लपविण्याची रुग्णांची मानसिकता, आजार होण्याची कारणे, फिशर आणि फिशच्यूमधील फरक, गुदगत आजारांचे टप्पे, वैद्यकीय उपचार, उपचार सुरु झाल्यावर घ्यायची काळजी, ऑपरेशननंतर पाळावी लागणारी पथ्ये, कालानुरूप ऑपरेशन करण्याच्या पद्धतीतील बदल, गुदगत आजारात लेझर तंत्राच्या साह्यानं सर्जरी अशा विविध विषयांवर डॉ. उज्वल बारंगे या मुलाखतीतून मार्गदर्शन करतील. 'आरोग्य संवाद' या कार्यक्रमाची या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी अमरावती केंद्राची असून सादरकर्ते आशिष गावंडे आहेत. हा कार्यक्रम आकाशवाणी अमरावती केंद्राबरोबरच News On Air या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येईल. मुलाखतीचा आस्वाद घेण्याचे आवाहन अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख भय्यालाल टेकाम आणि कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे यांनी केले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages