केन्द्रीय संचार ब्यूरो अमरावती तर्फे अंतरर्राष्टीय योग दिवस २०२६ कार्यक्रम सूर्योदय योग अनुसन्धान समिति अमरावती यांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.
अमरावती, दि. 22 : अंतरराष्ट्रीय योग दिवस 2026 च्या निमित्ताने माहिती व प्रसारण मंत्रालय,
भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती आणि सूर्योदय योग अनुसंधान समिति,
शामनगर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून 2025 रोजी योगाभ्यास घेण्यात आल्या.
21 जूनला योग दिवस कार्यक्रमामध्ये योगाचार्य श्री नितिन बोबडे, उप-अभियन्ता, अमरावती मनपा
यांच्या प्रमुख उपस्थितीत योग साधना आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. योग
साधनेमुळे शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती मिळते जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी दररोज योग अभ्यास करावा असे प्रतिपादन योगाचार्य श्री नितीन बोबडे यांनी केले.
यावेळी श्री. रवि जोंधलेकर यांनी योग प्रात्यक्षिक करत योगसाधना केली. श्री गणेश चांदने अणि श्री गोपाल
उताने हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक माहिती अधिकारी श्री शशिकांत
पटेल अणि यांनी उपस्थित योग साधकांना कार्यक्रमाचा घेण्याचा उद्देश अणि योग साधनेचे फायदे याबद्दल
मार्गदर्शन केले. केंद्रीय संचार ब्युरो तर्फे सर्व साधकांना यावेळी अल्पहाराचे वितरण करण्यात आले. योग
प्रात्यक्षिक अणि साधना झाल्यानंतर उपस्थित योग साधकांनी वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश
दिला.
कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यात सूर्योदय योग अनुसंधान समिति मधील योग साधक कार्यकर्ते
आणि केंद्रीय संचार ब्युरोचे सागर लाडोळे यांचे सहकार्य लाभले.