रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 26, 2026

रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

 



अमरावती, दि. 26  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात रविवार, दि. 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण राबविण्यात येणार आहे. यात पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ही मोहिम शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओपासून सुरक्षित करण्यासाठी राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी भागातील 1 लाख 45 हजार 540 बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. यासाठी जिल्ह्यात 1 हजार 998 बुथ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. बुथवर लसीकरण केल्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस घरोघरी जाऊन घरभेटीद्वारे लसीकरण केले जाणार आहे.

या मोहिमेत पालकांनी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना केंद्रावर नेऊन पोलिओची डोज द्यावा, असे आवाहन जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages