आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिन साजरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 26, 2026

आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिन साजरा



अमरावती, दि. 26  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय ऑलम्पिक दिन मंगळवार, दि. 23 जून रोजी जिल्हा क्रीडा संकुलात साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे, क्रीडा अधिकारी प्रशिक्षण ममता कोळमकर, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने उपस्थित होते.

यावेळी श्री. जाधव यांनी खेळाडुंना ऑलम्पिक संघटनेची माहिती दिली. दि. 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिन साजरा करण्याबाबतचे महत्त्व आणि इतिहासावर प्रकाश टाकला. खेळाडुंना क्रीडा व एकतेच्या माध्यमातून जगभरात एकता, मैत्री आणि शांतता वाढविण्याच्या उद्देशाने हा दिवस क्रीडा शक्तीला समर्पित केला जात असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांनी आर्चरी, तायक्वाँदो, खो-खो, टेबल टेनिसमधील गुणवंत खेळाडुंचा सत्कार केला. यावेळी ऑलम्पिक दिनाबाबत चित्रफित दाखविण्यात आली. खेलो इंडीया, अमरावती आर्चरी केंद्राची खेळाडू कुमकूम मोहोड हिने अंटलिया आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक प्राप्त करून दिल्याची कामगिरी चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली.

स्वप्नील चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. तालुका क्रीडा अधिकारी शेख सलीम शेख हुसेन यांनी आभार मानले.

कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील आर. बी. वडते, त्रिवेणी चौधरी, वैशाली इंगळे, धनंजय भारसाकळे, शिपाई प्रणिती भिमटे, शेख अकील, शुभम मोहतुरे, अमोल लांडे, राजपाल इंगळे, सागर बोरकर, वैभव पातुर्डे यांनी पुढाकार घेतला.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages