वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 26, 2026

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन



अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विकास महामंडळांतर्गत विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

यात राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (रामोशी समाज), पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (वडार समाज), श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ (गवळी समाज), ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (लोहार समाज, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (विणकर समाज), श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ (नाथपंथी, नाथपंथी, डवरी, गोसावी, भराडी जोगी, किंगरीवाले, मरीआईवाले, बहुरुपी. गोसावी, स्मशान जोगी, बाळसंतोषी किंगरीवाले, गोंधळी, डोंबारी, चित्रकथी समाज) या महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. यात वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, 25 टक्के वीज भांडवल कर्ज योजना, 1 लाख रुपयांचे थेट कर्ज योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन योजनेअंतर्गत vnvjntdc.org या वेबसाईटवर अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज करण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला, पॅनकार्ड, व्यवसाय परवाना, व्यवसायाचे दरपत्रक, वाहनासंदर्भात लायसन्‍स परवाना कागदपत्रे आवश्यक आहे.

योजनांबाबत अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, ए-विंग, पोलीस आयुक्तालयामागे, अमरावती दुरध्वनी क्र. 0721- 2551191 येथे संपर्क करावा, तसेच महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट vnvjntdc.org  ला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आधार ताजणे यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages