सृजन मराठी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्यची विभागीय समन्वयकांची घोषणा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 11, 2026

सृजन मराठी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्यची विभागीय समन्वयकांची घोषणा




दि,११

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सृजन मराठी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी साहित्यिक चळवळीने महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी विभागीय समन्वयकांची नियुक्ती जाहीर केली आहे. साहित्यिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राज्यभरातील साहित्यप्रेमींना एकत्रित जोडणे हा या नियुक्त्यांचा मुख्य उद्देश आहे.

परिषदेच्या राज्यस्तरीय समन्वय फोरममध्ये पुढील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे :
कोकण विभाग समन्वयक : प्रा. डाॅ.शुभम पाटील (पालघर)
संपर्क : ८३५६०८६४३७
(कार्यकक्षा : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग.)
पुणे विभाग समन्वयक
अनघा नंदाने कोल्हापुर
संपर्क.8600288169
( कार्यकक्षा-पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर.)
नाशिक विभाग समन्वयक : श्री. बाळासाहेब देशमुख (अहिल्यानगर)
संपर्क : ९४२३७८२१००
(कार्यकक्षा : नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहिल्यानगर.)

(अतिरिक्त प्रभार : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली.)

अमरावती विभाग समन्वयक : श्री. प्रफुल्ल मंदा श्रीधर कुकडे (अमरावती)
संपर्क : ९७६३३८५४२८
(कार्यकक्षा : अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ.)

नागपूर विभाग समन्वयक : अँड. भूपेश पाटील (नागपूर)
संपर्क : ९८५०३३८०२१
(कार्यकक्षा : नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली.)

सृजन मराठी साहित्य परिषद राज्यभर साहित्य, संस्कृती आणि सृजनशीलतेची व्यापक चळवळ उभी करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. नव्या समन्वयकांच्या नेतृत्वाखाली विविध साहित्यिक उपक्रम, कवी संमेलने, कथाकथन, चर्चासत्रे, वाचन चळवळ आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहेत.

राज्यातील सर्व साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार, वाचक आणि मराठी भाषा प्रेमींनी या साहित्यिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

 सृजन मराठी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages