प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गैरप्रकार; रोशन गॅस एजन्सीकडून लाभार्थ्यांची फसवणूक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 11, 2026

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गैरप्रकार; रोशन गॅस एजन्सीकडून लाभार्थ्यांची फसवणूक


शिरजगाव कसबा दि. ११ :-
ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्कच्या वृत्तानुसार, चांदूर बाजार शहरात 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'अंतर्गत लाभार्थ्यांच्या नावावर मोठा गैरप्रकार आणि फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.
 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावावर नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करून फसवणूक केली जात आहे.
 विशेषतः पटोली (तालुका भैंसदेही) येथील **'रोशन गॅस एजन्सी'**च्या माध्यमातून हा संपूर्ण गैरप्रकार निर्माण झाला आहे. लाभार्थ्यांच्या नावावर योजनेचा लाभ देताना मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केले गेले आहे.
 चांदूर बाजार येथील एक महिला आणि ब्राह्मणवाडा थडी येथील एक व्यक्ती यांच्या संगनमताने व माध्यमातून हा सर्व गैरप्रकार घडवून आणला गेला आहे.
 या फसवणुकीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
 या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नगरसेविका कल्याणी कोंडे यांच्यासह चांदूर बाजार येथील पीडित महिलांनी स्थानिक पोलीस ठाणेदारांची भेट घेऊन त्यांना या आशयाचे लेखी निवेदन सादर केले आहे.
असाच प्रकार शिरजगाव कसबा येथे झाला असून येथील अंदाजे १५० महिलांचे 'प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस  योजना नावे मध्यप्रदेशातील धाबा येथील नईम याने त्याचे गॅस  agency वर परस्पर वळती  केली आहे. तो त्या नावाचे गॅस कनेक्शन चा दुरुपयोग करत आहे. 
यासंदर्भात शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यात येणार आहे. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages