नशा मुक्त सप्ताहाला १७ जूनपासून सुरवात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, June 17, 2026

नशा मुक्त सप्ताहाला १७ जूनपासून सुरवात



  ऑनलाईन शपथ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि.१८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): देशातील अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नोडल विभाग म्हणून काम पाहत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात 'नशा मुक्त भारत अभियाना’ला  17 जूनपासून सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी 26 जून रोजी साजरा होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिना'चे औचित्य साधून जिल्ह्यात ‘नशा मुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित विशेष 'नशा मुक्त सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे.

समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे, व्यसनमुक्ती केंद्रे, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी अमली पदार्थ मुक्तीचा संकल्प करावा आणि केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://nmba.dosje.gov.in/content/take-a-pledge) जाऊन ऑनलाईन पद्धतीने तसेच विविध स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन करून ऑफलाईन पद्धतीनेही नशामुक्तीची सामुहिक शपथ घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages