अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज 'ड्राय डे' - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, June 17, 2026

अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज 'ड्राय डे'


जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारत निवडणूक आयोगाने अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदेश जारी केले असून, त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात 'कोरडा दिवस' पाळण्यात येणार आहे.या आदेशानुसार, गुरुवार, 18 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजेच मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमरावती जिल्ह्यातील सर्व ठोक आणि किरकोळ मद्यविक्रीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशांमध्ये अंशतः बदल करून प्रशासनाने हा सुधारित निर्णय घेतला आहे. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची काटेकोरपणे नोंद घ्यावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा अंमलबजावणीत कुचराई करणाऱ्या मद्यविक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांवर 'महाराष्ट्र दारूबंदी कायद्या’न्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages