‘नशा मुक्त भारत अभियान’ सामाजिक सप्ताहाचे उद्‌घाटन; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 19, 2026

‘नशा मुक्त भारत अभियान’ सामाजिक सप्ताहाचे उद्‌घाटन;



26 जूनपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

अमरावती, दि.२० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागांतर्गत 26 जून या 'आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिवसा'चे औचित्य साधून जिल्ह्यात 26 जून पर्यंत 'सामाजिक सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात या सप्ताहांतर्गत 'नशा मुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे उद्‌घाटन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

याप्रसंगी समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, वित्त व लेखा विभागाचे सहायक संचालक श्री. मेतकर तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, महामंडळांचे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी नशा मुक्तीचे संकल्प पत्र व शपथ घेतली, तसेच निर्धारित संकेतस्थळावर ऑनलाईन शपथही नोंदवण्यात आली. या पार्श्वभूमीवर निवासी शाळांचे मुख्याध्यापक व शासकीय वसतिगृह अधीक्षक यांनी विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शासकीय अनुदानित वसतिगृहे, व्यसनमुक्ती केंद्रे आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages