तीन वर्षांपासून रेंगाळलेले सोनोरी येथील अतिक्रमण काढले - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, June 20, 2026

तीन वर्षांपासून रेंगाळलेले सोनोरी येथील अतिक्रमण काढले


(BDO) डॉ. निलेश वानखडेंचा सत्कार

 चांदूरबाजार दि.२० :-

तीन वर्षांपासून रेंगाळलेले रस्त्यावरील अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे. या धाडसी कामगिरीबद्दल तक्रारकर्त्याने गट विकास अधिकारी (BDO) डॉ. निलेश वानखडे यांचा सत्कार केला.

चांदूरबाजार जवळील सोनोरी गावातील हे प्रकरण आहे. गेल्या तीन वर्षांपासून एका व्यक्तीने रस्त्याच्या सरकारी जागेवर घरकुल मंजूर करून घेतले होते.सरकारी जागेवर अतिक्रमण करून हे घराचे बांधकाम करण्यात आले होते. या बेकायदेशीर बांधकामामुळे रस्त्यावरील रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत होता.

या अतिक्रमणाविरोधात बाबाराव खडसे यांनी प्रशासनाकडे सातत्याने तक्रार व पाठपुरावा केला होता. हे प्रकरण अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे चांगलेच गाजले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी २६ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत सोनोरी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या सूचनांची दखल घेण्यात आली.

चांदूरबाजार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (BDO) डॉ. निलेश वानखडे यांनी ११ जून रोजी या प्रकरणात रीतसर सुनावणी घेतली. संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून त्यांनी तातडीने सोनोरी येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. 

त्यानुसार श्रीमती चंद्रकला वानखडे व जितेंद्र खडसे यांच्या घरासमोरील रहदारीचा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला.एका वृद्ध महिलेच्या घरासमोरील रस्ता मोकळा करून तिला प्रशासनाने न्याय मिळवून दिला.

गेल्या तीन वर्षांपासून न्याय मिळवण्यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या बाबाराव खडसे यांनी प्रशासनाच्या या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.

त्यांनी थेट कार्यालयात जाऊन बीडीओ डॉ. निलेश वानखडे यांचे आभार मानले आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages