जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 19, 2026

जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध;



25 जूनपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण  19 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे रीतसर मुनादी (दवंडी) देऊन हे प्रारूप आरक्षण नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. या प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणामध्ये जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील 44, वरूड 43, दर्यापूर 49, अंजनगाव सुर्जी 34, अमरावती 46, भातकुली 36, नांदगाव खंडेश्वर 51, चांदुर रेल्वे 30, धामणगाव रेल्वे 55, तिवसा 30, मोर्शी 39 आणि चांदुर बाजार तालुक्यातील 41 अशा एकूण 498 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा तपशील समाविष्ट आहे. दरम्यान, हे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या नागरिकांना यावर काही आक्षेप किंवा हरकती घ्यायच्या असतील, त्यांच्यासाठी 25 जून 2026 ही अंतिम तारीख असणार आहे. शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयात हे आक्षेप स्वीकारले जातील, तरी इच्छुकांनी विहित मुदतीत आपले आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages