मातोश्री शासकीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 4, 2026

मातोश्री शासकीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू;


·        ६० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

·        इच्छुक विद्यार्थांकडून अर्ज आमंत्रित

 

            अमरावती, दि.४ : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत संचालित मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, वलगाव रोड, अमरावती येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयीन व तंत्रशिक्षण विभागासाठी एकूण ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये उच्च माध्यमिक विभागासाठी १२, कनिष्ठ महाविद्यालयासाठी १८, महाविद्यालयीन विभागासाठी १८ आणि तंत्रशिक्षण विभागासाठी १२ जागांचा समावेश राहणार, अशी माहिती वसतिगृहाचे गृहप्रमुख अनिल तसरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

            प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २०२५-२६ या आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. गुणवत्तेनुसार व सामाजिक आरक्षणाच्या निकषांनुसार प्रवेश दिला जाणार असून, प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक व गरजू विद्यार्थ्यांनी वसतिगृह कार्यालयातून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विनामूल्य अर्ज प्राप्त करून आपल्या शाळा अथवा महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून १० दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत, असे आवाहन श्री तसरे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages