बिबट्याच्या कातडीचा तुकडा बाळगणाऱ्या तीन आरोपींना अटक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 15, 2026

बिबट्याच्या कातडीचा तुकडा बाळगणाऱ्या तीन आरोपींना अटक

 दिनांक: १६ जून २०२६




            अमरावती, दि. १६ :  गुगामल वन्यजीव विभागांतर्गत वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष, हरिसाल वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त कारवाईत बिबट्याच्या कातडीचा तुकडा बेकायदेशीररीत्या बाळगणाऱ्या तीन आरोपींना शुक्रवार, दि. 12 जून 2026 रोजी अटक करण्यात आली.

            सदर कारवाईदरम्यान आरोपीकडून बिबट्याच्या कातडीचा एक तुकडा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मांगीलाल किशोरी इवणे (वय 45 वर्ष), रा. चिरा, जि. बैतुल (म.प्र.), पोलीस स्टेशन दामजीपुरा, दिपक बाबुलाल उईके (वय 25 वर्षे), रा. ढालगाव, जि. खंडवा (म.प्र.), पोलीस स्टेशन रोशनी. कमल रतन ठाकूर (वय 31 वर्ष), रा. धामा गोलाई, जि. खंडवा (म.प्र.), पोलीस स्टेशन -रोशनी यांचा समावेश आहे.

            या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुगामल वन्यजीव विभागामार्फत सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या बिबट्याच्या कातडीचा उगम, त्यामागील संभाव्य वन्यजीव गुन्हेगारी साखळी, तसेच इतर संबंधित व्यक्तीचा सहभाग याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे.

            सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी राऊत, दिनेश केंद्रे, स्वप्नील राऊत, मुकेश जावरकर, अनंता नायसे, हरिसाल वनपरिक्षेत्रातील राजेश धुमाळे, मनिषा भुसुम, ज्योती धिकार तसेच वन्यजीव प्रेमी चेतन भारती यांच्या सहभागाने पार पडली.

            वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर शिकार, वाहतूक, व्यापार किंवा ताबा हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती नागरिकांनी तात्काळ वन विभागास द्यावी, असे आवाहन गुगामल वन्यजीव विभागामार्फत करण्यात आले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages