महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 15, 2026

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा

       मुंबई, दि.१५ : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (MOA) शिष्टमंडळाने माजी खासदार आणि असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांसाठी युवकांना योग्य प्रशिक्षण मिळण्याबाबत चर्चा झाली.


        राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, उत्तर-पूर्वेकडील राज्यांतील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे. पायाभूत सुविधांचे महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्राने तेथील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्रात आणून प्रशिक्षण उपलब्ध करुन द्यावे. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अभियानांतर्गत इतर राज्यांमध्ये विविध खेळांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.



        यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (MOA) महासचिव संजय शेटे, सहसचिव डॉ. प्रदीप खांडरे, ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे महासचिव सुंदर अय्यर, त्रिपुरा ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव तसेच ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे सहसचिव सुजित रॉय यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.



 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages