ब्राम्हणवाडा थडी दिनांक २२ ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क )_
दिनांक 21 जून 2026 ला ज्ञानोदय विद्यामंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी योग या विषयावर आपल्या योग वशिष्ठ या ग्रंथातून लेखन करणारे विज्ञानवादी तत्त्वनिष्ठ संत श्री. संत गुलाबराव महाराज यांच्या फोटोचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.महानंदा खांडे यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे उप- मुख्याध्यापक श्री संदीप भुयार सर कॉर्डिनेटर अनुराधा इंगोले व सपना श्रीवास हे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री संदीप भुयार व कु.अनुराधा इंगोले यांनी वेगवेगळे योगासने, त्याचे महत्त्व व एक्यूप्रेशरची पॉईंट याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. यानंतर यानंतर सर्व कर्मचारी वर्गाने योगासने केली.
या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन शारदा बोरकर यांनी केले.