आठवडी बाजारात पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान
दि.३० शिरजगाव कसबा :-
२९ जून चे रात्री ८ वाजता शिरजगाव कसबा मेघा नदीचे उगम स्थानावर ढग सदृश्य परिस्थिती होऊन अतिवृष्टी झाल्याने मेघा नदीला महापूर आला व आठवडी बाजारातील हॉटेल, हार्डवेअर व इतर व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.
२ वर्षाचे अगोदर मेघा नदी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु आठवडी बाजारातील सांडपाणी व लगतचा नाल्यातील पाणी संरक्षण भिंती मध्ये ड्रेनेज पुलद्वारे नदीमध्ये न सोडल्याने दरवर्षी आठवडी बाजारामध्ये पुराचे पाण्याने नुकसान होत आहे. यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
0 Comments