हयात प्रमाणपत्र सादर करण्याची ३० जून अंतिम मुदत. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, June 17, 2026

हयात प्रमाणपत्र सादर करण्याची ३० जून अंतिम मुदत.

अमरावती दि. १८:-

             


                     ३० जूनपर्यंत 'हे' काम करा, नाहीतर जुलैपासून पेन्शन होणार बंद!

३० जून पर्यंत ऑनलाईन हयात प्रमाणपत्र (Life Certificate) सादर न केल्यास जुलै पासून पेन्शन बंद होणार आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे। 

महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना हा नियम लागू करण्यात आला आहे।  
शासनाने यंदापासून हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली आहे। बनावट लाभार्थी रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। 
 ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपले हयात प्रमाणपत्र डिजिटल प्रणालीवर अपडेट केलेले नाही, त्यांना ३० जून पर्यंतची शेवटची संधी देण्यात आली आहे। या मुदतीत दाखला जमा न केल्यास जुलै महिन्याचा पेन्शन हप्ता रोखला (बंद केला) जाईल। 
📱 घरबसल्या ५ मिनिटांत हयात प्रमाणपत्र कसे सादर करावे?
लाभार्थी आता त्यांच्या मोबाईलवरून केवळ ५ मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात
ॲप डाऊनलोड करा: गुगल प्ले स्टोअरवरून 'Beneficiary Verification App' आणि 'Aadhaar Face RD App' हे दोन अधिकृत ॲप्स डाऊनलोड करा।
ॲप उघडून तुमचा आधार नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला OTP व्हेरीफाय करा।
चेहरा स्कॅन करा: मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याने लाभार्थ्याचा Face Authentication (चेहरा स्कॅन) करा।
प्रमाणपत्र डाऊनलोड करा: प्रक्रिया यशस्वी झाल्यावर स्क्रीनवर हयात प्रमाणपत्र दिसेल, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। 
टीप: जर मोबाईलवर करणे शक्य नसेल, तर लाभार्थी जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' (CSC Center) किंवा सेतू केंद्रात जाऊन बायोमेट्रिकद्वारे हे काम करू शकतात।‌ 
📄 आवश्यक कागदपत्रे:
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड
  • चालू असलेला मोबाईल नंबर (जो आधारशी लिंक असावा)
  • पेन्शन किंवा योजनेचा खाते क्रमांक/PPO नंबर 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages