जिल्ह्यातील सर्व 840 ग्रामपंचायतींचा ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, June 3, 2026

जिल्ह्यातील सर्व 840 ग्रामपंचायतींचा ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग



अमरावती, दि.४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची सुदृढ आरोग्याकडे यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात सध्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान प्रभावीपणे राबविले जात असून, जिल्ह्यातील एकूण 840 ग्रामपंचायतींपैकी सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात शंभर टक्के सहभाग नोंदविला आहे. संपूर्ण जिल्हा आता स्वच्छता आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देत असून, ग्रामीण भागात या निमित्ताने एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे.

या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व ग्रामपंचायती आणि स्थानिक आरोग्य संस्थांमध्ये आरोग्यविषयक विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. अभियानांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यवाहीच्या जोरावर ‘सुदृढ विजेता’ म्हणून घोषित होण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता एक निरोगी स्पर्धा सुरू झाली आहे. गावागावात स्वच्छता आणि आरोग्य सुविधा बळकट करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

या संपूर्ण मोहिमेचे चोख नियोजन व उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व ग्रामपंचायतींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून वेळोवेळी मार्गदर्शन व आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे, ज्यामुळे या मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून अमरावती जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गांधी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे,  सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि आरोग्य यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages