आचारसंहितेमुळे जून महिन्यातील विभागीय व महिला लोकशाही दिन रद्द - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 29, 2026

आचारसंहितेमुळे जून महिन्यातील विभागीय व महिला लोकशाही दिन रद्द



          अमरावती, दि. ३० : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, आगामी जून २०२६ महिन्यातील 'विभागीय लोकशाही दिन' आणि 'महिला विभागीय लोकशाही दिन' आयोजित करण्यात येणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

          सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन, तसेच महिला विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. या दिवशी नागरिक व महिला आपल्या तक्रारी व समस्या थेट प्रशासनासमोर मांडतात.

          परंतु, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या १८ मे २०२६ च्या प्रसिद्धीपत्रकानुसार सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू आहे. शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार, ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू असते, त्या ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येत नाही.

          या कायदेशीर तरतुदीचा दाखला देत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जून २०२६ मध्ये अमरावती विभागातील विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन आयोजित करता येणार नाही. तरी सर्वसामान्य नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages