मुंबईत ‘जिल्हा युवा पुरस्कार’ आज १ मे रोजी प्रदान होणार -अप्पर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

मुंबईत ‘जिल्हा युवा पुरस्कार’ आज १ मे रोजी प्रदान होणार -अप्पर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात




मुंबई, दि. १ मे  : समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव व्हावा आणि त्यांना युवा विकासासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मुंबई शहर जिल्ह्यात ‘जिल्हा युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षीचा पुरस्कार १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात यांनी दिली.

जिल्हास्तर युवा पुरस्कार समितीची बैठक नुकतीच मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात उपस्थित होते. तसेच समितीचे इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते.

बाप्पासाहेब थोरात म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यातील युवक-युवती तसेच सामाजिक संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेल्या विविध समाजोपयोगी कार्याची दखल या पुरस्कारासाठी घेतली जाते. यात समाजातील दुर्बल घटकांसाठीचे कार्य, अनुसूचित जाती-जमाती व आदिवासी भागातील उपक्रम, झोपडपट्टी व नागरी वस्ती सुधारणा, व्यसनमुक्ती, आपत्ती व्यवस्थापन, रोजगार निर्मिती, विज्ञान-तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, तसेच पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

तसेच राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान, तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उपक्रमांनाही या पुरस्काराद्वारे गौरवण्यात येते. या उपक्रमामुळे इतर युवकांना प्रेरणा मिळून समाजोपयोगी कार्यात त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पुरस्काराचे स्वरूप गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे असून युवक-युवतींना प्रत्येकी १० हजार रुपये, तर सामाजिक संस्थांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages