वरुड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

वरुड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न;


42 उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान

अमरावती, दि.२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, मॉडेल करिअर सेंटर आणि संत अच्च्युत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 42 उमेदवारांची प्राथमिक निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरुडचे प्राचार्य कमल किशोर फुटाणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ येथील आदिवासी आश्रम शाळेचे प्रकल्प अधिकारी किशोर काळे, तसेच कौशल्य विकास कार्यालयाचे पंकज कचरे, आकाश येवले , प्रथमेश सोहळे उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये नागपूर, पुणे येथील टॅलेंट कॉर्प सोल्युशन आणि हैदराबाद येथील गार्डियन ट्रेनिंग अकादमी या दोन नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 100 रिक्त पदांसाठी 163 उमेदवारांनी नोंदणी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खापरे यांनी तर रश्मी माथणकर यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages