महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ ; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 28, 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ ;



अल्पसंख्य माध्यमांच्या उमेदवारांसाठी विशेष परीक्षा केंद्र निश्चित

सविस्तर माहितीसाठी www.mscepune.in संकेतस्थळ उपलब्ध

          अमरावती, दि. २९ : शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट २०१३ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET)-२०२६ चे आयोजन रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. सदर परीक्षा राज्यातील शिक्षक पात्रता निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी व सिंधी माध्यमातील संबंधित सर्व विद्यार्थी व उमेदवारांनी आपल्या माध्यमासाठी निश्चित करण्यात आलेल्या जिल्ह्यांची माहिती परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून आवश्यक ती नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी केले आहे.

          महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी व सिंधी माध्यमातील विद्यार्थी/उमेदवारांची राज्यातील संख्या तुलनेने कमी असल्याने संबंधित उमेदवारांसाठी विशेष परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या माध्यमांच्या उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्येच परीक्षा केंद्रे निश्चित केली जाणार असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळला भेट द्यावी.

          संबंधित सर्व विद्यार्थी व उमेदवारांनी आपल्या माध्यमासाठी निश्चित करण्यात आलेल्या जिल्ह्यांची माहिती तपासून आवश्यक ती नोंद घ्यावी, असेही परिषदेव्दारे आवाहन करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages