श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोट येथे महाराष्ट्र दीन साजरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोट येथे महाराष्ट्र दीन साजरा

 


अकोट दिनांक २  कु.प्रियंका केदार  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

अकोट येथील स्थानिक श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष पोटे संस्था अध्यक्ष हे होते तर प्रमुख उपस्थितीत संस्था सचिव डॉ.मेघनाताई पोटे,विज्ञान अध्यपाक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र भास्कर,संस्था संचालक अमोल तळोकार,प्राचार्य पि.बि.रावणकर,पर्यवेक्षक पि.एम.गावंडे हे उपस्थित होते.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून एस.एम. पोटे यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात आले.अकोला जिल्ह्यातून दुसरी नंबर येणारी कु.तन्वी गजेंद्र गुजर हिचा सत्कार करण्यात आला.तर कु.मनस्वी कातंखेडे एस बी सी मधून जिल्यातून प्रथम क्रमांक मिळवला,त्या बद्दल तिचा सत्कार करण्यात आला.तन्वी गुजर,आयेश शहा,आनंदी रेळे, संस्कृती धुळे, श्रावणी ताठे, आनंदी पोंदे,धनश्री खडे, खुशी थोडा,वैदही गोंडचर,स्वरूप मगर,अभय शेगोकार,प्राप्ती नाथे, मनस्वी कातखेडे, ईश्वरी भावे,अनुष्का मालठाणकर,संस्कृती भावे, आदित्य थोटे, रोहित कळमकर,कृष्णा रेळे,मंथन बीजेवार,सोहम वायरे,या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी  पालक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages