लाभार्थ्यांनी ह्यात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र 30 सप्टेंबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, May 25, 2026

लाभार्थ्यांनी ह्यात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र 30 सप्टेंबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन



अमरावती, दि.26
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भातकुली तालुक्यामधील विविध विशेष सहाय्य योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी ह्यात प्रमाणपत्र आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन भातकुलीचे तहसीलदार अक्षय मंडवे यांनी केले आहे.

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी वर्षातून एकदा ह्यात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारने बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे.

लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून ऑनलाइन पद्धतीने ह्यात प्रमाणपत्र मोफत सादर करू शकतात. स्वतःचा मोबाईल नसल्यास लाभार्थी आपल्या नातेवाईकांमार्फत किंवा गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक, कर्मचारी यांच्या मदतीने हे काम पूर्ण करू शकतील. लाभार्थ्यांना सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रावर जाऊनही हे प्रमाणपत्र सादर करता येईल. येथे प्रक्रिया केल्यास 50 रूपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या नियमानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अनेक दिव्यांगांनी अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नसल्याची बाब लक्षात घेऊन, दिव्यांग सक्षमीकरण विभागाने या प्रक्रियेला दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

तालुक्याबाहेरील आणि स्थानिक पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा मानधनात खंड पडू नये, यासाठी बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ह्यात प्रमाणपत्र त्वरित नोंदवावे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र सादर करावे, असे आवाहन भातकुली तहसिलदार यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages