सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक नामतालिकेसाठी (पॅनल) अर्ज आमंत्रित २० एप्रिल अंतीम मूदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक नामतालिकेसाठी (पॅनल) अर्ज आमंत्रित २० एप्रिल अंतीम मूदत

 अमरावती, दि. १६ : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ (१) (ब) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम- ६९ (१) (फ) आणि नियम १९६१ मधील तरतुदींनुसार, सहकारी संस्थाच्या लेखा परिक्षणांसाठी सन २०२६-२०२८ या कालावधीसाठी राज्यस्तरीय लेखापरीक्षकांची नामतालिका तयार  करण्यासाठी mahasahakar.maharashtra.gov.in या पोर्टलवर दि. २० एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

          ऑनलाइन अर्ज संदर्भात परिपत्रकीय सूचना व सविस्तर माहिती सहकार विभाग/सहकार आयुक्त व सहकार निबंधक यांच्या संकेतस्थळावर आणि सर्व जिल्हा उपनिबंधक जिल्हा विशेष लेखापरीक्षक विभागीय सहनिबंधक यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.

           


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages