अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात येत्या तीन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या तापमानात वाढ होणार असून नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भारतीय हवामान खात्याने विदर्भात येत्या तीन दिवस उष्णतेच्या लाटेबाबत इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी उन्हात जाणे टाळावे, तसेच आवश्यक असल्यास उष्णतेपासून बचाव करण्याचा उपायाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Post a Comment
0 Comments