अंजनगावात जादूटोण्याचा प्रयत्न फसला; ४ आरोपींना अटक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, April 6, 2026

अंजनगावात जादूटोण्याचा प्रयत्न फसला; ४ आरोपींना अटक


अंजनगाव सुर्जी , दि.६ :- 
अंजनगाव सुर्जी येथील अंबादेवी साखर कारखाना परिसरात गुप्त धन शोधण्यासाठी जादूटोणा करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी एका तांत्रिकासह एकूण ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहीगाव रेचा - शेलगाव मार्गावरील बंद असलेल्या अंबादेवी साखर कारखाना परिसरातील आसरा देवीच्या मंदिरात घडली.
 रात्री १२ वाजेच्या सुमारास कारखान्याच्या चौकीदाराला मंदिरासमोर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तिथे जादूटोण्याचा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येताच चौकीदाराने तत्काळ पोलीस स्टेशन गाठले.
 पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांनी माहिती मिळताच शोधमोहीम राबवली. घटनेची गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींना चिखलदरा तालुक्यातून ताब्यात घेतले.
जप्त केलेले साहित्य: घटनास्थळी पोलिसांनी लिंबू, मिरची, हळद, कुंकू, बाहुल्या, हार-फुले तसेच खड्डा खोदण्यासाठी लागणारे टिकाव आणि फावडे जप्त केले आहेत.

राजाराम गंगाराम सावळकर (वय ५२, रा. चिखलदरा) - मुख्य तांत्रिक
मारोती जामकर (वय २९, रा. जनुना, ता. अचलपूर)
सुधाकर सुरेश कोळे (वय ३८, रा. जनुना, ता. अचलपूर)
मनोहर लक्ष्मण येवले (वय ४२, रा. जनुना, ता. अचलपूर)
कायदेशीर कारवाई:
सर्व आरोपींविरुद्ध 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा' तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(२), ३(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांनी नागरिकांना अशा अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारची कृत्ये अजिबात सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages