Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शहरात दुचाकीवरून येऊन पाण्याचे फुगे मारणाऱ्या टवाळखोरांचा उच्छाद;

 नागरिकांमध्ये संताप

दि.७ अमरावती : रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार शहरात वाढू लागले आहेत. ३ एप्रिल च्या रात्री ११.३० च्या सुमारास रस्त्यावरून चालत असलेल्या एका नागरिकावर दुचाकीवरून आलेल्या काही टवाळखोरांनी मागून घाणरड्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचे फुगा मारून पळ काढल्याची घटना घडली. शहरात हल्ली अश्या घटना वारंवार घडत असल्याने शहरात कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अश्या टवाळखोरांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिक दस्तूर नगर ते यशोदा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरुन पायदळ घरी जात असताना मागून भरधाव वेगात एका दुचाकीवर काही मुले आली. त्यांनी त्यांच्या पाठीवर घाणरड्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा फुगा जोरात मारला. या झालेल्या घटनेमुळे सदर व्यक्ती खाली पडता पडता वाचले. स्वतःला सावरून घाबरलेल्या नागरिकाने मागून येणाऱ्या एका दुचाकीच्या मदत मागून त्या टवाळखोर मुलांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते टवाळखोर मुले दुचाकीवरून वेगाने किरण नगर येथील खंडेलवाल सीमेंट दुकानाच्या समोरून जलाराम नगर कडे जाणाऱ्या रस्त्याने पळाले. त्यानंतर ते फरशी स्टॉप कडे जाणाऱ्या रस्त्याकडे त्यांची गाडी वळून फरशी स्टॉप चौकातून हरिगंगा मिल रस्त्याच्या दिशेने प्रसार झाले. या घटनेचा व्हिडिओ दस्तूर नगर चौकात असलेल्या ATM तसेच नामांकित दुचाकी शोरूम तसेच फरशी स्टॉप चौकात असलेल्या पेट्रोल पम्प च्या cctv मध्ये सापडतील जेणेकरून त्या टवाळखोरांची ओळख पटण्यास नक्की होईल.

या प्रकारामुळे पादचाऱ्यांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Tags

Post a Comment

0 Comments