'मिशन लक्ष्यवेध' अंतर्गत सोमवारी कुस्ती, वेटलिफ्टिंगची निवड चाचणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 22, 2026

'मिशन लक्ष्यवेध' अंतर्गत सोमवारी कुस्ती, वेटलिफ्टिंगची निवड चाचणी



अमरावती, दि २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे 'मिशन लक्ष्यवेध' ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कुस्ती आणि वेटलिफ्टिंग या खेळांसाठी अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुल येथे खेळाडूंची निवड चाचणी सोमवार, दि. 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

यात निवड झालेल्या खेळाडूंना निवासी स्वरूपात दर्जेदार व तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, निवास आणि भोजन व्यवस्था, क्रीडा विज्ञान विषयक सहाय्य, देश-विदेशातील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागाची संधी, शासन मान्यतेनुसार वैद्यकीय विमा सुरक्षा आदी सोयी-सुविधा मिळणार आहे.

निवड चाचणीसाठी वयोमर्यादा ही दि. 31 डिसेंबर रोजी 25 वर्षांखालील मुले व मुली असून खेळाडू महाराष्ट्र राज्यातील असावा. राज्यस्तरावरील पदक प्राप्त किंवा राष्ट्रीयस्तरावरील सहभागी खेळाडू हे निकष आहेत.

खेळाडूंना जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, गेल्या 2 वर्षातील कामगिरीची प्रमाणपत्रे, 3 पासपोर्ट फोटो, बोनाफाईड आणि पालकांचे संमती पत्र ही कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच शासनमान्य डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

निवड चाचणी ही विभागीय क्रीडा संकुलात दुपारी  12 वाजल्यापासून होणार आहे. अधिक माहितीसाठी सुशील मोहोड - ९७६३५७६५८८, अनुप वानखडे - ९८८१९८०२८२, सारंग ठाकरे – ९८३०१४६७०८,  प्रीती देशमुख - ७९७२९४७३५२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक शेखर पाटील यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages