मधपाळांसाठी 'मधुमित्र' व 'मधुसखी' पुरस्कार; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 22, 2026

मधपाळांसाठी 'मधुमित्र' व 'मधुसखी' पुरस्कार;



*4 मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. २३(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने २० मे रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून, राज्यातील यशस्वी मध उद्योजकांना 'मधुमित्र' व 'मधुसखी' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज ४ मे पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपाळांना प्रथम पुरस्कार 11 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 7 हजार रुपये, तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे. यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण 20 मे 2026 रोजी पुणे येथील समारंभात केले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी नामांकन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mskvib.org उपलब्ध आहेत. तसेच, जिल्ह्यातील खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयातूनही अर्ज प्राप्त करता येतील. या पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अमरावती ०७२१-२६६२७६२, ९४२०७७१५३५ किंवा संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्याशी ०२१६८-२६०२६४ संपर्क साधावा.

मधमाशीपालन क्षेत्रात कार्यरत असलेल्या मधपाळांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदिप चेचरे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages