रोजगार मेळाव्यात 63 उमेदवारांची निवड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, April 23, 2026

रोजगार मेळाव्यात 63 उमेदवारांची निवड





अमरावती, दि. २३ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 21 एप्रिल रोजी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 63 उमेदवारांची निवड करण्यात आली.

जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी तयांनी उमेदवारांनी आपल्या रोजगाराप्रती नेहमी जागृत आणि उत्साही असावे, असे सांगून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचेही कौतुक केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृपा अर्गुलेवर, संदीप यादव, पंकज कचरे उपस्थित होते.

मेळाव्यात 6 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला. यात 100 रिक्त पदांसाठी 142 उमेदवारांनी नोंदणी केली. यात प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 63 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांपैकी 3 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते जागीच नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. आकाश येवले यांनी सूत्रसंचालन केले, पंकज कचरे यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages