महिला सक्षमीकरणासाठी पुरुषांचा पुढाकार; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, April 6, 2026

महिला सक्षमीकरणासाठी पुरुषांचा पुढाकार;


                                   


      

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'सुधारक सन्मान­’ सोहळ्याचे आज आयोजन

अमरावती, दि. ०७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): नवतेजास्विनी कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलता दाखविणाऱ्या आणि गावपातळीवर महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या पुरुषांचा आज, मंगळवार, दि. 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांच्या हस्ते संपन्न होईल. 'जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल'म्हणून निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील तीन पुरुषांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी 'सुधारक सन्मान' देऊन गौरविण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वतीने 'नवतेजास्विनी' कार्यक्रमांतर्गत जेंडर व न्युट्रिशन या घटकासाठी वर्ष 2025-26 चे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मूळ हेतू गावस्तरावर महिलांसाठी सक्षम व पूरक वातावरण निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे आणि समाजात संवेदनशील पुरुष रोल मॉडेल घडविणे हा आहे.

महिलांच्या प्रगतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अंतिम 3 पुरुषांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिलांच्या प्रगतीत पुरुषांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages