विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी 9 व 10 एप्रिलला बंद; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, April 6, 2026

विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी 9 व 10 एप्रिलला बंद;

 


नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याचे मजीप्राचे आवाहन

अमरावती, दि. ०७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत (मजीप्रा) येणाऱ्या 125 गावे विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे आगामी  गुरुवार, दि. 9 एप्रिल आणि शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026  रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मजीप्रामार्फत करण्यात आले आहे.

विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या 600 मिमी व्यासाच्या मुख्य पाईप लाईनवर 'अल्ट्रा सोनिक जलमापक' बसविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, वाढीव 105 गावे पाणी पुरवठा योजनेच्या अशुद्ध जलवाहिनीचे  कामही याच काळात पूर्ण केले जाणार आहे. या तांत्रिक कामांच्या दृष्टीने दि. 9 आणि 10 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण दिवसभर या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या योजनेत समावेश असलेल्या सर्व 105 गावातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी आधीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages