बेघर बांधवांच्या साक्षीने फुले-आंबेडकर विचारांचा जागर; बडनेऱ्यात महिलाशक्तीचा प्रेरणादायी उपक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, April 21, 2026

बेघर बांधवांच्या साक्षीने फुले-आंबेडकर विचारांचा जागर; बडनेऱ्यात महिलाशक्तीचा प्रेरणादायी उपक्रम





बडनेरा, दि.२२ एप्रिल २०२६ :
आधार बेघर निवारा, बडनेरा येथे आधार संघाच्या वतीने समाजप्रबोधनाचे महान प्रेरणास्थान महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शनी व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमास बेघर बांधवांचीही उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक संवेदनशीलतेची वेगळीच छटा प्राप्त झाली.
नवी वस्ती परिसरातील महिला बचत गट तसेच विविध वस्तीस्तर संघांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ज्योतीताई राठोड (संचालक, आधार बेघर निवारा केंद्र) होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मा. छायाताई नारनवरे, मा. कल्पनाताई हरणे, मा. विजयाताई घोडेस्वार, मा. नूतनताई वासनिक, मा. छायाताई भटकर, मा. अनुपमाताई गोंडाने, मा. रेखा मुळे, मा. सीमा मडामे तसेच मा. शिलाताई चौधरी (नवनिर्माण संघ – नियोजित) यांची उपस्थिती लाभली. विविध संघांच्या अध्यक्षा देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मार्गदर्शनपर भाषणात मा. विजय डवरे (जिल्हा प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती), मा. पल्लवी ढोले (महा. अनिस, बडनेरा) तसेच मा. प्रफुल्ल मंदा श्रीधर (समुदाय संघटक) यांनी समता, शिक्षण, स्वाभिमान व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात संगीता बरमैया यांनी बाबासाहेबांवरील सुंदर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच सौ पदमाताई पहूरकर, श्री. पहूरकर (ज्येष्ठ नागरिक) व रोहित धोंगडे (काळजीवाहक, आधार) यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सोनल जगदाळे (सचिव, आधार संघ) यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ .मनाली अभिजीत इंगळे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन उमा इंगोले यांनी केले.
या निमित्ताने महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित महिलांनी उत्साहाने सहभाग घेत समता, स्त्रीसक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. कुंदा मेश्राम, किरण दुपारे, वंदना पवार, अंजली मोकाशे, रमा मोहोड, मोनाली सदावर्ते या CRP सदस्यांची तसेच आधार संघ व बचत गटातील महिलांची मोलाची साथ लाभली.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages