त्रासदायक गतिरोधक हटविणार, हाय बिम लाईटवर कारवाई *जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, April 21, 2026

त्रासदायक गतिरोधक हटविणार, हाय बिम लाईटवर कारवाई *जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

 




अमरावती, दि. 22 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात अपघात रोखण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर गतिरोधक बसविण्यात येतात. मात्र अवैज्ञानिक पद्धतीने गतिरोधक बसविण्यात आले आहे. ही गतिरोधक वाहनधारकांना त्रासदायक ठरत असल्याने ते तातडीने हटविण्यात यावे, तसेच वाहनांवर प्रखर उजेड करणारी हाय बिम लाईटवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज रस्ते सुरक्षा समितीची बैठक पार पडली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात तयार करण्यात येणारे गतिरोधक वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरू नये. यासाठी ठरवून दिलेल्या मानकानुसार गतिरोधक तयार करण्यात यावेत. गतिरोधकावर पांढऱ्या पट्ट्या काढण्यात याव्यात. यामुळे गतिरोधकाची वाहनचालकांना कल्पना येऊ शकेल. जड वाहनांवर प्रखर उजेड असणारी बाय बिम लाईट लावण्यात येत आहे. यामुळे समोरील वाहनचालकाची दृष्यमानता कमी होत असल्यामुळे अपघात होत आहे. यावर पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे मोहिम राबवून कारवाई करावी. शहरात सायलेंसरमध्ये बदल करून दुचाकी वाहने चालविल्या जातात. यावर पोलिसांनी कारवाई करावी.

शिंगणापूर, हिवरखेड, डवरगाव आणि लेहगाव येथील हायमास्ट लाईटचा प्रश्न आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचातींशी संपर्क साधून येथी प्रकाशव्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. तसेच रिद्धपूर येथील पुलाच्या बांधकामामुळे झालेल्या अपघाताची काळजी म्हणून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग देण्यात यावी. तसेच रहदारीच्या रस्त्यांवर विकास कामे सुरू असल्यास सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात याव्यात. अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पीएम राहत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत दिड लाख रूपयांपर्यंत उपचार करण्यात येतात. याबाबत जनजागृती करण्यात यावी. अपघाताची माहिती गोळा करण्यासाठी आयआरडीएच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी. रस्ता सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेमध्ये स्पीड गन, स्पीड मिटर आदी सुविधा उभाराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages