महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 8, 2026

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत



            अमरावती, दि. ०९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत सन 2025-26 या वर्षातील नवीन अर्ज भरण्यासाठी, तसेच सन 2023-24 व 2024-25 मधील अर्जांची त्रुटीपूर्तता  करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय मुलींसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती अशा विविध योजना राबविल्या जातात.

            सर्व संस्था आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन नूतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून घ्यावेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' करण्यात आले आहेत, त्यांच्याकडून तात्काळ त्रुटींची पूर्तता करून घेऊन ते अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे.

             अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी व महाविद्यालयांनी नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, 'Re-Apply' करण्यासाठी आणि प्रलंबित अर्जांची त्रुटी पूर्तता करण्यासाठी तत्परता दाखवावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages