अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 जूनपर्यंत मुदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 8, 2026

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 जूनपर्यंत मुदत




            अमरावती, दि. ९(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 चे नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, तसेच 2023-24 व 2024-25 या वर्षांतील अर्जांची त्रुटीपूर्तता (Re-apply) करण्यासाठी आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण व परीक्षा फी प्रतिपूर्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अशा पाच महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

            विद्यार्थ्यांच्या लॉगिनला त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' केलेले अर्ज संबंधित महाविद्यालयांनी तातडीने विद्यार्थ्यांकडून दुरुस्त करून घ्यावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी नवीन अर्ज भरण्याची व प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages