राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेश परीक्षेसाठी मुदतवाढ- 20 एप्रिल अंतिम मूदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, April 19, 2026

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेश परीक्षेसाठी मुदतवाढ- 20 एप्रिल अंतिम मूदत



            अमरावती, दि. २० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज  (RIMC), डेहराडून येथील प्रवेश पात्रता परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेत महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली असून आता 20 एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी जाहीर प्रकटनाद्वारे दिली आहे.

            राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजची प्रवेश परीक्षा 7 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल 2026 पर्यंत होती, ती आता वाढवून 20 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली आहे.

            डेहराडून येथील कमांडंट आर.आय. एम. सी. यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आता बदललेल्या मुदतीनुसार 20 एप्रिलपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.


 

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages