अमरावतीत 2 मे पासून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, April 30, 2026

अमरावतीत 2 मे पासून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 



अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सन २०२६-२७ या वर्षासाठी ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दि. 2 मे पासून हे शिबीर सुरू होणार असून दि. 15 मेपर्यंत चालणार आहे.

सदर शिबिर हे दि. २ मे पासून सुरू होणार असून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत चालणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. या शिबिरात एकूण १५ हून अधिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, बॅडमिंटन आणि धनुर्विद्या या ४ खेळांचे प्रशिक्षण राज्य शासनाच्या एनआयएस गुणवत्ताधारक प्रशिक्षकांमार्फत विनामूल्य दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त तलवारबाजी, बास्केटबॉल, स्क्वॅश, नेटबॉल, शुटींगबॉल, मल्लखांब, टेबल टेनिस, थ्रोबॉल, स्केटींग, कुडो आणि बॉक्सिंग या खेळांचेही प्रशिक्षण दिले जाईल. जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल, श्री गणेशदास राठी विद्यालय, गुरुकुल विद्यालय, नांदगाव खंडेश्वर, जय बजरंग व्यायामशाळा, तोगंलाबाद, दर्यापूर आणि इतर तालुका क्रीडा संकुलांमध्ये हे प्रशिक्षण वर्ग चालणार आहेत.

शिबिरादरम्यान खेळाडूंना आहार, दुखापतीवरील इलाज, फिजीओथेरेपी आणि क्रीडा मानसशास्त्र या विषयांवरही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी व्हॉलीबॉल - राहुल निवडंगे ७७७४००१५७९, सॉफ्टबॉल - स्वप्नील चांदेकर ९७६७०००९४९, बॅडमिंटन - रितेश अनंतवार ८६६९०८४१४२, धनुर्विद्या (आर्चरी) - प्रफुल्ल डांगे ९९२३००८४११, वेदांत वानखडे ७४९९०९२३१२ यांच्याशी संपर्क साधता येईल.

खेळाडूंच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या संधीचा अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages