13 अवैध तंबाखू विक्रेत्यांकडून दंड वसूल - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, April 30, 2026

13 अवैध तंबाखू विक्रेत्यांकडून दंड वसूल




अमरावती, दि. 30
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शहरातील सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कारवाई करण्यात आली. या कारवाईत 13 अवैध तंबाखू विक्रेत्यांकडून दंड वसूल करण्यात आला.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. शहरातील गांधी चौक, अंबादेवी मंदिर परिसर, राजकमल चौक आणि श्याम चौक या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. यावेळी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 मधील कलम 4 सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आणि कलम 6 अ मध्ये 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विक्री करण्यास बंदी याचे उल्लंघन करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत 13 विक्रेत्यांकडून 4 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages