मातंग समाजासाठी सोमवारी विशेष कार्यशाळा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, April 30, 2026

मातंग समाजासाठी सोमवारी विशेष कार्यशाळा



अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील वंचित घटकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार, दि. 4 मे रोजी दुपारी 11 वाजता सामाजिक न्याय भवनात होणार आहे.

कार्यशाळेत मातंग समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्या येणार आहे. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना फायदेशीर ठरत असल्याने यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मातंग समाजातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. टी. खडसे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages