जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांसाठी विशेष तपासणी मोहीमेला प्रारंभ; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, March 13, 2026

जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांसाठी विशेष तपासणी मोहीमेला प्रारंभ;


प्रलंबित अर्जदारांना हजर राहण्याचे आवाहन

अमरावती , दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे प्रलंबित दिव्यांग अर्जांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन युडीआयडी  पोर्टलवर दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले आहेत, परंतु अद्याप वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत, अशा सर्व अर्जदारांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

            अर्जदारांनी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत आपले मूळ अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात उपस्थित राहावे. ही मोहीम पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली.

           केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कॅन्सर, हृदयरोग, टी.बी., एचआयव्ही ग्रस्त, चर्मरोग व इतर दुर्धर आजार हे दिव्यांगत्वाच्या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे अशा आजारग्रस्तांनी ऑनलाईन अर्ज करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अनेकदा माहितीअभावी असे रुग्ण अर्ज करतात आणि त्यांना आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. पात्र दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घेऊन आपली तपासणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages