आधुनिकरणामुळे लुप्त होत चालली घानमक्कड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 2, 2026

आधुनिकरणामुळे लुप्त होत चालली घानमक्कड


 ब्राम्हणवाडा थडी (विलास खाजोने)दि.३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

       वसंताची चाहूल..झाडांना नवपालवी..पळस,पांगार्याला मनमोहक लाल पिवळी फुले जणु निसर्गाने दिलेले वरदान.त्यात होळी, रंगपंचमी विविध रंगांची उधळण करणारा सण . या काळात ग्रामीण भागात आकर्षणाचं केंद्र होती ती घानमक्कड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचं तिच्यावर बसुन फिरकी घेवून आनंद लुटायचे ती घानमक्कड आता आधुनिकीकरणामुळे लुप्त होत आहे.गावातील तरूण मंडळी जंगलातुन भोकर किंवा बाभळीचे लाकुड आणुन त्याला कमानीचा आकार द्यायचे व दुसऱ्या लाकडाला सरळ कापून वरुन निमुळते टोक तयार करून ते लाकुड जमिनीत सरळ गाळून कमानिसारखे लाकुड वरुन ठेवायचे त्या अगोदर निमुळत्या लाकडास वंगण म्हणून ग्रिस किंवा आईल लावत असायचे .त्यावर चिंचोका ठेवायचे.त्याने कर्..कर् ..असा आवाज यायचा त्याने आनंद अधिक द्विगुणित व्हायचा.हि घानमक्कड फाल्गुन वद्य एकला  लावली जायची.व हुताशनी पोर्णिमेला ती होळीमध्ये जाळायचे असा प्रघात होता.घानमक्कडवर लहान मोठे सर्वच बसुन फिरकी घेवून आनंद लुटायचे ती घानमक्कड आता जवळजवळ लुप्त होत चालली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages