सामाजिक न्यायच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, March 3, 2026

सामाजिक न्यायच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


अमरावती, दि. ०३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्या वर्षासाठी आणि ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहीत केलेल्या अटीची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल. इच्छुकांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्या वर्षाकरीता चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा लागणार आहे.

सन 2024-2025 या वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेव आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब आंबेडकर पारितोषिक, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पुरस्काराची जाहिरात आणि अर्जाचा नमुना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या sjsa.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे संपर्क करावा. समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांनी पुरस्कारासाठी दि. 15 मार्चपर्यंत अर्ज कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages