अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, March 3, 2026

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात


          अमरावती, दि. ३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे ‘अमृत पेठ 2026’ या उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक 6 ते 8 मार्च 2026 या कालावधीत शहरांतील जाधव पॅलेस येथे संपन्न होणार आहे.

       या कार्यक्रमाला  ‘अमृत’ पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, अमृतचे विभागीय व्यवस्थापक  प्रवीण कोळेश्वर उपस्थित राहणार आहे. स्थानिक नवउद्योजक, महिला बचत गट आणि स्टार्टअप्स यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

          अमरावतीकरांनी आपल्या कुटुंबासह या मेळाव्याला भेट द्यावी. या मेळाव्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. हा मेळावा महिला उद्योजकांसाठी आपली कौशल्ये आणि उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी निर्माण करणार आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील थेट संपर्कामुळे स्थानिक उद्योगांना नवी गती प्राप्त होईल. या प्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी 9527317068 किंवा 7249451152 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages