अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच वतीने १० मार्च ला महिला दिन व महिलांचा सत्कार कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, March 3, 2026

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच वतीने १० मार्च ला महिला दिन व महिलांचा सत्कार कार्यक्रम


अमरावती दिनांक ३  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)


"तीच आहे सृजनाची निर्मिती,

चहूकडे प्रकाश देऊनी जगाला ती उध्दारी...!"


स्त्री शक्तीचा सन्मान आणि गौरव होणार...


अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच अमरावतीचे वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 

१० मार्च ला–महिला दिन कार्यक्रम साजरा करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमांमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या समस्त भगिनींना व राजकीय सामाजिक वैद्यकीय क्षेत्रात कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या महिला ना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महिला मंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. कांचन मुरके यांनी केले आहे.

आपल्या क्षेत्रात श्रमाने ठसा उमटवणाऱ्या भगिनींचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार असून स्त्री सामर्थ्याचा उत्सव  साजरा होणार आहे.

 कांचन रिसॉर्ट अमरावती मध्ये १० मार्चला हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता संपन्न होणार असल्याचे कळविण्यात आलेले आहे ‌.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages